शरद पवार रुग्णालयात
मुंबई, ता. २१ : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना नियमित तपासणीसाठी दोन दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली. पवार यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याची कोणतीही बाब नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अलीकडेच पवार यांनी व्हीलचेअरवर बसून राज्यसभेची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीत माध्यमांशीही संवाद साधला होता. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात छातीत संसर्ग आणि डिहायड्रेशनमुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.