मुंबई

एमआयडीसीत परवानगीपूर्वीच वृक्षतोड?

CD

एमआयडीसीत परवानगीपूर्वीच वृक्षतोड?
तुर्भेतील भूखंडधारकावर कारवाईची मागणी
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : तुर्भे एमआयडीसी परिसरातील एका मोठ्या भूखंडावर परवानगी मिळण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंडधारकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तुर्भे एमआयडीसीतील ‘विधी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एलएलपी’ या संस्थेच्या भूखंड क्रमांक जन १६/१ वर बांधकामासाठी अडथळा ठरत असल्याचे कारण देत ५९३ झाडे तोडण्याची तसेच ९९४ झाडांचे प्रत्यारोपण करण्याची एमआयडीसी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागण्यात आली आहे. सुमारे ५४ एकर क्षेत्रफळाच्या या भूखंडावर १९६५ साली फायझर कंपनीची स्थापना झाली होती. त्यामुळे येथे अनेक जुनी व मोठ्या आकाराची झाडे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी या प्रस्तावावर हरकती नोंदवत अर्जदाराने प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या झाडांच्या तुलनेत कमी झाडांची नोंद कागदोपत्री दाखवली असल्याचा आरोप केला आहे. अनेक झाडांवर अनुक्रमांक देण्यात आलेले नसून, काही झाडांची आधीच कत्तल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे अधिकृत वृक्षगणना आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हरकतदारांचे म्हणणे आहे, की अर्जदाराने नियुक्त केलेल्या सल्लागाराच्या अहवालावरच एमआयडीसी वृक्ष अधिकाऱ्यांनी विश्वास ठेवला असून, पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी, परवानगी प्रक्रिया सुरू असतानाच भूखंडावर पुन्हा अवैधरीत्या वृक्षतोड सुरू असल्याचे आरोप होत आहेत.
या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरण संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः जुनी आणि पुरातन झाडे नष्ट झाल्यास जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

कोट
भूखंड क्रमांक १६/१वर मागितलेल्या परवानगीपेक्षा अतिरिक्त झाडे असल्याचे तसेच काही झाडे आधीच तोडल्याबाबत आम्ही तक्रार केली होती. मात्र वृक्ष अधिकारी, अर्जदार आणि अर्जदाराचे सल्लागार यांच्यात आपापसांत साटेलोट असल्याने आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात विनापरवाना वृक्षतोड केल्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी.
- सत्यवान गायकवाड, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई
कोट
भूखंड क्रमांक १६/१वर मागितलेल्या परवानगीपेक्षा अतिरिक्त झाडे तोडली असतील, तर त्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विनापरवानगी वृक्षतोड झाल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.
- शंकर आव्हाड, कार्यकारी अभियंता व वृक्ष अधिकारी, एमआयडीसी महापे कार्यालय, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT