खारघर प्रोमो रनला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
ऑगस्टमधील महापौर मॅरेथॉनसाठी तयारी
पनवेल, ता. २१ (बातमीदार): पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन प्रोमो रन’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून कार्यक्रम उत्साहात पार पडला. तब्बल २५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत ‘फिट पनवेल’चा संदेश प्रत्यक्षात उतरवला.
या उपक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
५ कि.मी. आणि १० कि.मी. अशा दोन गटांत स्पर्धा घेण्यात आली. आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या रनला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. केवळ दोन दिवसांत नोंदणी पूर्ण झाल्याने अनेकांना सहभागाची संधी मिळू शकली नाही.
आगामी ऑगस्ट २०२६ मध्ये होणाऱ्या मुख्य ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’साठी हा प्रोमो रन महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. मुख्य स्पर्धेत ५, १०, २१ आणि ४२ कि.मी. अंतराच्या गटांचा समावेश असेल. अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.