मुंबई

पाणी वाटपात तफावत!

CD

पाणीवाटपात तफावत
दक्षिण मुंबईत मुबलक पाणी, उपनगरांत मर्यादित पुरवठा

विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः मुंबईतील असमान पाणीवाटपाचा प्रश्न हा केवळ प्रशासकीय तांत्रिक समस्या नसून मुंबईकरांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नाचे निगडित आहे. ही समस्या आता दीर्घकालीन होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी आता दोन्ही उपनगरांतून होऊ लागली आहे. समान पाणी मिळणे, हा सर्वांचा हक्क असून तसे पालिकेने नियोजन केले पाहिजे, अशी मागणी पाणी हक्क समितीने केली आहे.
यंदा मुंबईत पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कडाक्याच्या उन्हाने मुंबई होरपळत आहे. याचा परिणाम मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांवर होत आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने मुंबई महानपालिकेचे जल अभियंता खाते चिंताग्रस्त झाले आहे. परिणामी, मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.
मुंबईला मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र वाढती लोकसंख्या पाहता मुंबईला सध्या किमान पाच हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे; मात्र दररोज होणारा पाणीपुरवठा हा अपुरा पडत आहे. त्यातही दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील ३४ टक्के पाणी चोरी आणि गळतीमुळे वाया जाते.
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत शहरातील लोकसंख्या कमी आहे; मात्र तुलनेने शहराला होणारा पाणीपुरवठा हा अधिक आहे. शहरात श्रीमंत वर्ग राहत असल्याने या भागातील पाणीपुरवठा अधिक असल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरावर अन्याय होत असल्याची भावना आहे.

अपुऱ्या पाणीपुरवठ्याने असंतोष
मुंबईत पाणी वितरणामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. दक्षिण मुंबई उच्चभ्रू भाग असल्याने या भागात दररोज मुबलक आणि सतत पाणीपुरवठा होत असतो; मात्र झोपडपट्ट्या, चाळी या भागात मर्यादित वेळेसाठीच पाणी मिळते. कधी-कधी दिवसातून फक्त दोन-तीन तास पाणीपुरवठा होतो. त्यामुळे उपनगरांतील पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.

समान पाणी वितरण करा!
मुंबईतील पाण्याचे असमान वाटप हे केवळ तांत्रिक समस्या नसून सामाजिक आणि आर्थिक असमानतेचेही प्रतिबिंब आहे. यासाठी प्रशासन, नागरिक आणि धोरणकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. समान पाणी मिळणे हा सर्वांचा हक्क आहे, अशी प्रतिक्रिया पाणी हक्क समितीचे समन्वयक सीताराम शेलार यांनी दिली.


मुंबईत दररोज होणारा पाणीपुरवठा - ३,९०० दशलक्ष लिटर
मुंबई शहर : ३० टक्के पाणी
पूर्व उपनगर : ३५ टक्के पाणी
पश्चिम उपनगर : ३५ टक्के पाणी

लोकसंख्या
शहर - ३२ लाख
पश्चिम उपनगर - ३५ लाख
पूर्व उपनगर - २४ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT