मुंबई

उल्हासनगरातील खड्डे हद्दपार होणार

CD

उल्हासनगरातील खड्डे हद्दपार होणार

उल्हासनगर, ता.२१ (बातमीदार) : उल्हासनगरातील प्रवेशद्वारांना नवी झळाळी देण्यात येणार असून खड्डे हद्दपार करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभापती दिप्ती दुधानी यांनी दिली. यावेळी त्यांचे पती नविन दुधानी, मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे, मुख्यलेखा परीक्षक विलास नागदिवे उपस्थित होते.

दिप्ती दुधानी या जीवन इदनानी यांच्या साई पक्षाच्या नगरसेविका असून त्या शिवसेनेसोबत आहेत. मागच्या २०१७ च्या निवडणुकीत त्या प्रभाग समिती ३ च्या सभापती होत्या. यंदा त्यांना शिवसेना-भाजपा युतीत सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पद देण्यात आले आहे. ज्या विभागातून शहरातील विकास कामांचा पाया रचला जातो, त्या विभागाचे सभापती पद मिळाले आहे. शहरात विकासकामे सुरू असल्यामुळे खड्डे पडले आहेत. विशेषतः शहरातील प्रवेश द्वारावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. विकासकामांना गती असून ती सर्व लवकरात लवकर पूर्ण करून खड्डेमुक्त शहर देण्याचा मानस असल्याचे दिप्ती दुधानी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला डेब्यू का मिळालं नाही? संजय मांजरेकरांनी सांगितलं मोठं कारण

दुचाकीवर आई-वडील नशेत, ४ महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडलं; ४०० मीटरपर्यंत लक्षातच आलं नाही, नंतर... पोलिसांनी सांगितली धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Marleshwar Waterfall Route : मार्लेश्वरला जाण्याचा विचार करताय? मग, 'हा' रस्ता पुढील 4 महिन्यांसाठी पूर्णपणे राहणार बंद; देवस्थानने का घेतला असा निर्णय?

SCROLL FOR NEXT