मुंबई

जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता

CD

जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता
रुग्णांना उपचार घेण्यात अडचणी; इतरत्र पाठवण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील औषधोपचार विभागात (मेडिसीन) डॉक्टरांची कमतरता भासू लागल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. आजारपण, रजा आणि काही डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.
सध्या औषधोपचार विभागातील ओपीडी इतर विभागातील डॉक्टरांकडून तात्पुरत्या स्वरूपात चालवली जात आहे. ऑर्थोपेडिक, सर्जरी, ईएनटी आणि नेत्र विभागातील डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत असले तरी ते प्रामुख्याने प्राथमिक उपचार देत असून, गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्यत्र पाठवले जात असल्याचे सांगितले जाते.
या परिस्थितीमुळे रुग्णांना वेळेवर तपासणी व उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी तपासण्या उशिरा होत असल्याने उपचार प्रक्रियेलाही विलंब होत असल्याची तक्रार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने डॉक्टरांची संख्या वाढवून सेवा सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र काही दिवसांपूर्वी बंद पडले होते, मात्र ते आता पुन्हा सुरू करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या समस्येबाबत महापालिकेच्या आगामी महासभेत प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचे नगरसेविका शिवानी परब यांनी सांगितले.
ट्रॉमा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हनुमंत वायकुळे म्‍हणाले, की रिक्त पदांवर नव्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयात दोन प्राध्यापक, एक वरिष्ठ निवासी डॉक्टर, तीन आवास अधिकारी असून, ओपीडी सुरळीत सुरू आहे. डॉक्टरांची कमतरता असली तरी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जात आहे.

काही डॉक्टर आजारपण तसेच रजेमुळे अनुपस्थित होते. आता ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. यादरम्यान एमबीबीएस डॉक्टरांमार्फत ओपीडी सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे रुग्णसेवेवर कोणताही गंभीर परिणाम झालेला नाही. रिक्त पदांवर नव्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. हनुमंत वायकुळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red Sea tension: लाल समुद्रात इस्रायली जहाजांना बंदी! हूती बंडखोरांचा मोठा निर्णय; दिसताच हल्ला करण्याची धमकी

IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठा विजय; पदार्पणवीर मानव सुतारसह वॉशिंग्टन सुंदर चमकले

MSRTC Bus Trouble: दे धक्का! ४५ किमी प्रवासात लालपरी ५-६ वेळा बंद पडली, प्रवाशांवरच ढकलण्याची वेळ

Power Crisis: अनेक दिवस वीजपुरवठा खंडित, महिला त्रासली, भोंगळ प्रशासनावर संताप व्यक्त; Video Viral

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

SCROLL FOR NEXT