विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यात विविध कारणांनी रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १३ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने सहा जागा बिनविरोध, तर तीन जागा उमेदवारांअभावी रिक्त राहिल्या आहे.
विक्रमगड तालुक्यातील वेढेचरी, मोह बुद्रुक, दाददे, सारंशी, खुडेद, सुकसाळे या ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. म्हसरोळी, उपराळे, साखरे या तीन जागा उमेदवारांअभावी रिक्त राहिल्या आहेत, तर आंबेघर तर्फे धरमपूर या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी थेट लढत होणार आहे. खोस्ते सरपंचपदासाठी ही पोटनिवडणूक होत असून दोन उमेदवार रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचे मतदान २८ एप्रिलला होणार असून ग्रामीण भागातील स्थानिक नेतृत्वाला ही निवडणूक एक मोठी संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.