मुंबई

लिंगायत जंगम समाजाच्या दफनभूमीच्या प्रश्नासाठी खा. तटकरे यांची भेट

CD

लिंगायत जंगम समाजाच्या दफनभूमीच्या प्रश्नासाठी खा. तटकरे यांची भेट
रोहा, भुवनेश्वर परिसरासाठी तातडीने जागा उपलब्ध करण्याची मागणी
रोहा, ता. २२ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील लिंगायत जंगम समाजासाठी स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी समाजाच्या प्रतिनिधींनी खासदार सुनील तटकरे यांची सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली. हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्यावर खासदार तटकरे यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
रोहा शहर तसेच भुवनेश्वर परिसरात लिंगायत जंगम समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून, समाज बांधवांना दफनभूमीच्या अभावामुळे सातत्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी रोहा तालुका पंचक्रोशी जंगम समाजाने पुढाकार घेत ही भेट घेतली.
या वेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, समाजनेते महादेव सरसंबे, उपाध्यक्ष मनोहर स्वामी, राष्ट्रीय जंगम संघटना रायगड समन्वयक विनोद स्वामी, महिला मंडळ अध्यक्षा प्रिया जंगम यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन खा. सुनील तटकरे यांनी दिले.
चौकट
प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू
दफनभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनालाही सक्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रोह्यातील आढावा बैठकीत तहसीलदार किशोर देशमुख व मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांना या विषयाकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.

फोटो कॅप्शन :
खासदार सुनील तटकरे यांची लिंगायत जंगम समाज बांधवांनी भेट घेऊन दफनभूमीची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Shirur Law & Order: : शिरूर तालुका नशामुक्तीसाठी तहसिलसमोर आठव्या दिवशीही सत्याग्रह; पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

Nilanga Crime : साडीने हातपाय बांधून तरुणाचा महिलेवर अत्याचार; माणुसकीला काळिमा फासणारी घटना, नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT