मुंबई

क्रीडा शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष

CD

कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : शालेय शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण विषयाला महत्त्व असूनही राज्य सरकारकडून दोन दशकांपासून क्रीडा शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पदवीधर बेरोजगार आहेत. सरकारच्या अनास्थेविरोधा महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे २७ एप्रिलपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सरकारी निर्णयानुसार क्रीडा शिक्षकांच्या १०० टक्के जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात याव्यात, रिक्त पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन करू नये, पवित्र पोर्टल टेट २०२५ भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशा प्रमुख मागण्या महासंघातर्फे सरकारकडे करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात राज्यभरातील पात्रताधारक शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक प्रदुम्न जोशी, राज्याध्यक्ष संदीप मनोरे, राज्य सचिव तायाप्पा शेंडगे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक बौद्धिक विकासासह सर्वांगीण विकासासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याच माध्यमातून भविष्यातील सक्षम समाज आणि बलशाली राष्ट्रनिर्मितीची पायाभरणी होत असते. मात्र, या विषयाच्या अध्यापनाचे काम करणाऱ्या क्रीडा शिक्षकांच्या पदभरतीकडे सरकारने २० वर्षांपासून दुर्लक्ष केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष संदीप मनोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसीत मनसे कामगार युनियन स्थापनेवरून भाजप-मनसे आमनेसामने

SCROLL FOR NEXT