उल्हासनगर, ता. २२ (बातमीदार) : शहरातील अवैध डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून उल्हासनगर महापालिका पुन्हा एकदा राजकीय संघर्षाचे केंद्र बनली आहे. महापालिकेत महासभा सुरू असतानाच ‘डम्पिंग हटाव’चा नारा देत भाजप नगरसेवकांनी प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन केले. तसेच महासभेतही ठिय्या मांडला.
डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरातील हवा, आरोग्य आणि नागरिकांच्या जीवनाशी होत असलेल्या खेळाविरोधात पॅनेल क्र. १९ आणि २० मधील नगरसेवकांचा संताप उफाळून आला आहे. ‘डम्पिंग हटाओ, शहर बचाओ’ असा नारा देण्यात आला असून, प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, नगरसेवक प्रधान पाटील, राजेश वानखेडे, संजय सिंग, राजू गोपलानी, विपुल मयेकर, रत्नामाला दुर्गे, ललिता पाटील, सुनीता काकडे, राजू दुर्गे यांनी प्रशासनावर टीका करीत अवैध डम्पिंग ग्राउंड तत्काळ हटवण्याची मागणी केली.
निवेदनाकडे दुर्लक्ष
आरोग्याचा गंभीर विषय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जात असल्याचे नगरसेवकांनी म्हटले. भाजपच्या २८ नगरसेवकांनी १८ मार्चला महापौरांना निवेदन देऊन डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी केली होती, मात्र एक महिना उलटूनही महासभेत हा मुद्दा उपस्थित न झाल्याने संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान नगरसेवक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
धार्मिक कार्यक्रम रद्द
या अवैध डम्पिंग ग्राउंडचा परिणाम धार्मिक कार्यक्रमांवरही होत असल्याचे समोर आले आहे. शहरात आगमन अपेक्षित असलेले संत स्वामी देव प्रकाश महाराज यांनी परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे उल्हासनगर भेट रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.