भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदावर भाजप बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांच्या विजयामुळे शहरात नव्या सत्तासमीकरणांची चर्चा रंगली आहे. हा विजय केवळ काँग्रेस किंवा सेक्युलर फ्रंटचा नसून भाजप आमदार महेश चौघुले, आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुरेश म्हात्रे यांच्या अप्रत्यक्ष एकत्रित पाठिंब्याचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. भाजप नेतृत्वाकडून बंडखोरांवर कारवाई न झाल्याने; तसेच त्यानंतर पालिकेत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढल्याची चर्चा सुरू आहे. आमदार महेश चौघुले यांनी शुक्रवारी (ता. १७) महापौर दालनातील अँटी चेंबरमध्ये बसून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. त्यानंतर महापौर चौधरी यांनी शनिवारी (ता. १८) विभागप्रमुखांच्या घेतलेल्या बैठकीला आमदार रईस शेख उपस्थित राहून विविध कामांचाही आढावा घेतला. दरम्यान, एकाच वेळी दोन आमदार आणि महापौर अशा तिन्ही स्तरांवरून उत्तरदायित्वाची परिस्थिती निर्माण झाल्याने पालिका अधिकारी व कर्मचारी वर्गात संभ्रमाचे वातावरण असल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.