एकाच मंडपात ३० जोडप्यांचा विवाह
विक्रमगडमध्ये सामाजिक बांधिलकीतून उपक्रम
विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) ः संगमनगर-विक्रमगड येथील धरतरी माता मंदिरात ३० जोडप्यांचा एकाच मंडपात, एकाच मुहूर्तावर विवाह झाला. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम करण्यात आला.
ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत निघालेल्या वरातीने सोहळ्याची सुरुवात झाली. नववधू-वरांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून सर्व धार्मिक विधी, संस्कार रितीरिवाजानुसार पार पाडले. एकाच मंडपात सर्व विवाह सोहळे पार पडल्याने परिसरात आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमादरम्यान आयोजक संस्थेच्या वतीने प्रत्येक नवदाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. त्यांना संसारोपयोगी भांडी, शिधा, शाल-श्रीफळ देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे लग्नाचा खर्च परवडत नव्हता; मात्र संस्थेमुळे लग्न झाल्याचा आनंद दिसून आला.
-----------------------
सामाजिक आधार
समाजातील गरजू, होतकरू मुला-मुलींचे संसार उभे करणे, सामाजिक आधार देणे, विवाहासारखा महत्त्वाचा टप्पा सुलभ करणे, हाच ‘उत्सव धरतरीचा’ या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या भव्य सोहळ्यास परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.