मुंबई

उल्हासनगरात मोर्चेबांधणीला वेग

CD

उल्हासनगर, ता. २३ (बातमीदार) : महापालिकेच्या स्थायी व विशेष समिती सभापतींच्या निवडी निर्विघ्न पार पडल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडीच्या तारखेचा निर्णय महापौर अश्विनी निकम यांच्या हाती असून, या पदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महापालिका निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणे अपेक्षित असते; मात्र अद्याप ही प्रक्रिया सुरू झालेली नाही. याबाबत महापौर अश्विनी निकम यांनी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश मिळाल्यानंतर निवड प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच, नियमानुसार या पदावर डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना संधी मिळणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या घडामोडींवरून पराभूत उमेदवार, ठेकेदार व व्यावसायिकांना संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवकपदाची ‘लॉटरी’ नेमकी कुणाला लागते, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पक्षीय बलाबल व जागांचे गणित
महापालिकेतील ७८ निर्वाचित सदस्यांच्या संख्याबळानुसार सात स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे ३६ नगरसेवक असून, त्यांना वंचितचे दोन, एक अपक्ष व एक साई पक्षाचा पाठिंबा मिळून त्यांचे एकूण संख्याबळ ४० झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून चार, तर ३७ सदस्य असलेल्या भाजपच्या कोट्यातून तीन स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत.

इच्छुकांची लांबलचक रांग
दोन्ही प्रमुख पक्षांत या पदासाठी तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून पंचम कलानी, मनोज लासी, जीवन इदनानी, रमेश चव्हाण, मनीषा भानुशाली, राम चार्ली पारवानी, विक्की भुल्लर, कैलास तेजी; तसेच वंचितकडून सोनू पवार यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपकडून प्रदीप रामचंदानी, धनंजय बोडारे, प्रेम झा, कपिल अडसूळ, राकेश पाठक व नरेंद्र राजानी आदी इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शेतकऱ्यांनी रोखला शिक्रापूर-पाबळ मार्ग; चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला कडाडून विरोध, शेती आणि पाणी संकटात येईल

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

रंगभूमी गाजवलेला गारंबीचा बापू आता रुपेरी पडद्यावर ! पोस्टरने वेधलं लक्ष

Viral Video:"‘मी का थांबावं?’ निवृत्तीच्या प्रश्नावर हरमनप्रीतचा पलटवार; चाहत्यांना आठवला धोनीचा Viral Moment"

Panhala Fort Tourism Tax : पन्हाळा गडावर पर्यटकांची मोठी कोंडी! 15 रुपये कर देऊनही 'या' एका सुविधेसाठी करावी लागतेय कसरत; पाहा काय आहे स्थिती

SCROLL FOR NEXT