मुंबई

लाडक्या बहिणींच्या इ-केवायसीसाठी महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात चकरा

CD

लाडक्या बहिणींची उपेक्षा
ई-केवायसीअभावी लाखभर लाभार्थी वंचित
मनोर, ता. २३ (बातमीदार) ः मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांनी ३१ डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे, पण माहितीचा अभाव, अज्ञानामुळे ग्रामीण भागातील महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने लाखभर महिला योजनेपासून वंचित आहेत.
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला ३१ मार्च २०२६ नंतर ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यात ३१ डिसेंबर २०२५ च्या मुदतीत महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया करताना केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यातील सहा लाख २४ हजार ६५९ लाभार्थी महिलांपैकी ई-केवायसी अभावी लाभ बंद झालेल्या महिलांची संख्या अधिक आहे. ३१ डिसेंबरच्या मुदतीमध्ये ई-केवायसी केलेल्या ६५ हजार ५०२ लाभार्थी महिला, ३१ डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करण्यात अपयशी ठरलेल्या महिला मिळून जिल्ह्यातील एक ते दीड लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणे बंद झाले आहे.
----------------------------
सहा लाख २४ हजार ६५९ लाभार्थी
पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहीण पोर्टलवरील तीन लाख ३८ हजार तर नारीशक्ती दूत ॲप वरील दोन लाख ८५ हजार ८५७ मिळून सहा लाख २४ हजार ६५९ लाभार्थी आहेत. आतापर्यंत २५४ लाभार्थ्यांनी स्वतःहून लाभ सोडला आहे, तर ६५ हजार ५०२ लाभार्थी महिलांना ३० एप्रिल २०२६ च्या मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
---------------------------------
अखेरची संधी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ च्या मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांसाठी ऑनलाइन ई-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

Fake Lady Singham Arrested : पुण्यात तोतया 'लेडी सिंघम' समिना पठाणला अटक; पोलिसांच्या गणवेशात दाखवत होती रुबाब, पोलिसी खाक्या दाखवताच फुटलं बिंग!

Latest Marathi News Live Update : चित्रपट महामंडळासाठी ४९.९० टक्के मतदान; आज मतमोजणी, निकाल होणार जाहीर

Video : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

SCROLL FOR NEXT