मुंबई

सावंतवाडी संस्थानचा ९८ वा वर्धापन दिन उत्साहात

CD

सावंतवाडी संस्थानचा ९८ वा वर्धापनदिन उत्साहात
मुंबई, ता. २३ ः सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांचा ९८ वा वर्धापन सोहळा नुकताच दादर पश्चिमेतील मराठा वैभव समाजगृह, नानासाहेब सभागृह, स्टार मॉल, इथे उत्साहात पार पडला. या वेळी ‘राजमाता जिजाऊ’ हा एकपात्री २५ वा प्रयोग आरती मुनीश्वर यांनी सादर केला. एकपात्री भूमिकेची संकल्पना, संहिता लेखन, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा त्यांनी स्वतः केली होती. प्रमुख पाहुणे म्‍हणून मराठा बिझनेस फोरमचे अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाग, शिवसेना आमदार महेश सावंत, सानेगुरुजी पुरस्कार विजेते शिक्षक विजय सावंत, शाखा प्रमुख विजय पवार, मराठा फेडरेशनचे अध्यक्ष जी. एस. परब, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पवार, संस्थेच्या महिला अध्यक्षा सुचेता सावंत आदींची उपस्‍थिती होती. मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित सावंत, व्यवस्थापकीय विश्वस्त सतीश सावंत, कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, विश्वस्त दिवाकर दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, सरचिटणीस प्रभाकर परब, बाळा सावंत, प्रकाश नाईक, बाळा पाताडे, महादेव दळवी, किशोर सावंत, राजेंद्र परब यांनी विशेष मेहनत घेतली ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निता खानविलकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

Latest Marathi News Live Update : शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्वेक्षणाला तीव्र विरोध

Ayub Pathan story in Balbharti Class 4 Marathi: बालभारतीच्या चौथीच्या मराठी पुस्तकात अय्युब पठाण यांच्या ‘कौतुकाची थाप’ला स्थान

Pune News : पुणे महापालिकेसह आरएसएस कार्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी; शोधमोहिमेनंतर बॉम्बची अफवा असल्याचे निष्पन्न

SCROLL FOR NEXT