मुंबई

मान्सूनपूर्व तयारीला वेग

CD

मॉन्सूनपूर्व तयारीला वेग
१५ मेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश; नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य
वाशी, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीला गती देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांना १५ मेपर्यंत आवश्यक कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करत आपत्कालीन परिस्थितीत तत्पर राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विविध विभागप्रमुख, प्राधिकरणांचे अधिकारी आणि आपत्कालीन यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत नालेसफाई, गटारांची स्वच्छता आणि नाल्यातील गाळ त्वरित उचलण्यावर विशेष भर देण्यात आला. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गांभीर्याने घेत सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सी-१ श्रेणीतील इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले.
रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, झेब्रा क्रॉसिंग आणि साईनएजेस सुधारण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच दरडप्रवण भागांची पाहणी करून आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले. नैसर्गिक नाल्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी झोपड्यांचे स्थलांतर करण्यावरही भर देण्यात आला आहे.
नवीन खोदकामांवर निर्बंध घालत मंजूर कामे वेळेत पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले. झाडांची छाटणी, धोकादायक झाडे हटविणे तसेच होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अनधिकृत फलक हटविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
सायन-पनवेल महामार्गासह प्रमुख रस्ते खड्डेमुक्त ठेवणे, उड्डाणपुलांवर ब्लिंकर बसविणे आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय राखणे यावर भर देण्यात आला. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपिंग मशीन व मनुष्यबळ सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. एपीएमसी व रेल्वे परिसरातील नालेसफाई तसेच आरोग्य विभागाने औषधसाठा, अन्नसाठा व साथरोग नियंत्रणाची तयारी ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले.
डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले की, आपत्ती कधीही येऊ शकते, त्यामुळे सर्व प्राधिकरणांनी सतर्क राहून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय राखावा.

चौकट
नालेसफाई व जलनियंत्रण यंत्रणा सुदृढ करणे :
पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी नालेसफाई वेळेत पूर्ण करणे आणि नाल्यातील गाळ त्वरित उचलणे अत्यावश्यक आहे. यासोबतच पंपिंग यंत्रणा, मोबाईल पंप आणि प्रशिक्षित मनुष्यबळ सज्ज ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. या उपाययोजनांमुळे पूरस्थिती टाळता येईल आणि शहरातील दैनंदिन जीवन सुरळीत राहील.

चौकट
धोकादायक इमारती व आपत्कालीन तयारी :
सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे गरजेचे आहे. यासोबतच आपत्कालीन निवारे, अन्नसाठा, औषधसाठा आणि आरोग्य सुविधा तयार ठेवल्यास आपत्तीच्या काळात त्वरित मदत पुरविणे शक्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT