मुंबई

फळ बाजारात आंबा पिकवण्याकडे एफडीएचे लक्ष

CD

आंबा पिकवण्याकडे एफडीएचे लक्ष
बाजारात फिरत आहेत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी फळ बाजारात आंब्याचा हंगाम जोरात सुरू झाला असून, देशभरातून विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल होत आहेत. कोकणातील हापूसपासून ते कर्नाटक, केरळमधील बदामी, तोतापुरी, गुजरातचे लाल आंबे, कर्नाटकी आणि केरळी आंब्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. मात्र, या आंब्यांना कृत्रिमरीत्या आणि चुकीच्या पद्धतीने पिकवले जात नाही ना, याकडे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विशेष लक्ष ठेवून आहे.
सध्या कोकणातून दररोज सरासरी ५० ते ६० हजार पेट्या हापूस आंब्याची आवक होत आहे. त्याचबरोबर केरळ आणि कर्नाटकमधून विविध जातींचे आंबे मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहेत. हे आंबे बहुतांश कच्च्या स्वरूपात बाजारात दाखल होत असल्याने त्यांना विक्रीपूर्वी पिकवण्याची प्रक्रिया आवश्यक ठरते. यासाठी व्यापारी विविध पद्धतींचा वापर करतात. आंबा पिकवण्यासाठी ‘रायपनिंग चेंबर’ हा सर्वात सुरक्षित आणि वैज्ञानिक पर्याय मानला जातो. या पद्धतीत नियंत्रित तापमान आणि आवश्यक वायूंच्या सहाय्याने फळे नैसर्गिक पद्धतीने पिकवली जातात. मात्र, ही प्रक्रिया खर्चिक असल्याने काही व्यापारी कमी खर्चाच्या पर्यायांचा अवलंब करतात.
फळे पिकवण्यासाठी ‘इथोफोन’ पावडर स्वरूपात वापरण्यास परवानगी असली, तरी ती ठरावीक नियमांनुसारच वापरणे आवश्यक असते. अनेक व्यापारी या पावडरच्या पुड्या योग्य पद्धतीने वापरण्याऐवजी ती पाण्यात मिसळून थेट फळांवर फवारणी करतात. त्यामुळे रसायनांचा थेट संपर्क फळांशी येतो आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही पद्धत धोकादायक आणि नियमबाह्य मानली जाते. दरम्यान, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये आणि बाजारात सुरक्षित दर्जेदार फळे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रशासनाने ही मोहीम अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

अधिकारी ग्राहकांच्या वेशात
१ अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सध्या फळ बाजारात नियमितपणे पाहणी करत आहेत. संशयास्पद वाटणाऱ्या आंब्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. काही अधिकारी साध्या वेशात ग्राहक बनून बाजारात फिरत असल्याने त्यांना ओळखणेही व्यापाऱ्यांना शक्य होत नाही. ते थेट मालाची पाहणी करून तपासणीसाठी नमुने गोळा करत आहेत. मागील आठवड्यात कळवा परिसरातही अनेक व्यापाऱ्यांकडून फळांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
२ व्यापारी संघटनांनीदेखील व्यापाऱ्यांना फळांवर कोणत्याही प्रकारचे रसायन फवारू नये, तसेच केवळ मान्यताप्राप्त आणि सुरक्षित पद्धतींचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे.

बाजारात योग्य पद्धतीनेच आंबा पिकवला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बाजारात फिरून मालाची तपासणी करतात. तपासणीसाठी काही नमुने घेऊनही जातात. मात्र, अजूनपर्यंत कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
- संजय पानसरे, संचालक, फळ बाजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...

उच्च न्यायालयाचा बँक ऑफ बडोदाला दणका! सायबर फसवणुकीतील पैसे वृद्धेला परत करण्याचे आदेश

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते दीपिकाचे वडील; तिचं लग्न झाल्यावर बाथरूममध्ये बसून रडलेले, कोण आहे ती अभिनेत्री?

Alephata Crime : भोंदूगिरीच्या नावाखाली अत्याचार; आळेफाट्यात दोन 'बाबांना' बेड्या

Pune Bribe Case : भूजल सर्वेक्षण विभागातील दोन भूवैज्ञानिक लाच घेताना ताब्यात

SCROLL FOR NEXT