उद्योग क्षेत्राला पाठबळ
तारापूरला अखंडित वीजपुरवठा होणार
बोईसर, ता. २४ (वार्ताहर) : केंद्र शासनाच्या आरडीएसएसअंतर्गत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी कामांना वेग आला आहे. यामुळे पुढील १० वर्षांत वीजपुरवठा स्थिर राहण्याबरोबरच अखंडित होणार असल्याने उद्योग क्षेत्राला बळ मिळाले आहे.
योजनेअंतर्गत जीर्ण व धोकादायक झालेले विद्युत खांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच जुन्या व निकृष्ट अवस्थेतील वीजवाहिन्यांवरील धातू संरचना निर्मिती बदलून वहन क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. पावसाळ्यापूर्वी कालावधीमध्ये तयारीचा भाग म्हणून दुरुस्तीची कामेही गतीने सुरू आहेत. वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, सैल तारांना ताण देऊन सुरळीत करणे तसेच विद्युत रोहित्रावरील जंपर बदलण्याची कामे हाती घेतली आहेत.
----------------------------
कामे प्रगतिपथावर
आतापर्यंत ७० विद्युत खांब बदलण्यात आले असून, १० किलोमीटर वीजवाहिनीवरील काम पूर्ण झाले आहे. यासाठी ३० किलोमीटर नवीन विद्युत वाहक टाकण्यात आले आहेत. उर्वरित चार किलोमीटर काम प्रलंबित असून, त्यासाठी आणखी १२ किलोमीटर विद्युत वाहक बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्राचा वीजपुरवठा अधिक सुरळीत होणार आहे.
---------------------
वेगवेगळ्या योजनांमधील सर्व प्रस्तावित कामे जलद गतीने प्रगतिपथावर आहेत. लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-प्रभुचरण चौधरी, उपकार्यकारी अभियंता, बोईसर (औद्योगिक) उपविभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.