माणगाव बायपास अंतिम टप्प्यात
खासदार सुनील तटकरेंच्या प्रयत्नांना यश; वाहतूक कोंडीपासून दिलासा
माणगाव, ता. २४ (वार्ताहर)ः माणगाव बायपास आता अंतिम टप्प्यात आला असून, जून महिन्यापर्यंत बायपासची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. या बायपासमुळे माणगाव व कोकणातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे.
माणगाव शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहतूक आणि सतत होणारी कोंडी यामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः त्रस्त झाला होता. अनेकांना दररोज तासन्तास वाहतुकीत अडकून पडावे लागत होते. काहींना आपली कामे गाठता येत नव्हती, तर काहींनी अपघातांत आपले जीव गमावले.
सध्या गोद आणि काळ नदीवरील पूल, गर्डर बसविणे, भराव टाकणे आणि उर्वरित रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असून, सुमारे ३०० अभियंते आणि कामगार दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. या अथक परिश्रमांचे फळ लवकरच सर्वसामान्यांना मिळणार आहे.
हा बायपास सुरू झाल्यानंतर माणगाव शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सतत घडणाऱ्या अपघातांना आळा बसेल आणि अनेकांचे जीव वाचतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
चौकट
कामाला वेग
गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व कोकण संघटक ॲड. राजीव साबळे यांनी बायपासचे काम तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची गंभीर दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत प्रकल्पाला नवसंजीवनी दिली. निविदा प्रक्रिया गतिमान केली, भूसंपादनातील अडथळे दूर केले आणि वेळोवेळी आढावा बैठका घेत प्रशासनाला सतर्क ठेवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.