मुंबई

चौकाला ‘महाराणा प्रताप’ नाव देण्याची मागणी

CD

अंबरनाथ (वार्ताहर) : शहराच्या पश्चिमेकडील जुन्या पोलिस ठाण्यासमोरील चौकाला ‘महाराणा प्रताप चौक’ असे नाव देण्याची मागणी स्थानिक राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. कल्याण-बदलापूर रोड, फातिमा रोड आणि जुन्या पोलिस ठाण्यासमोरील हा महत्त्वाचा चौक अद्याप नामनिर्देशित नसल्याने या चौकाला ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे नाव देण्यात यावे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. भारताच्या महान सुपुत्राच्या स्मरणार्थ संबंधित चौकाला ‘महाराणा प्रताप चौक’ असे नाव देण्यात यावे तसेच त्या ठिकाणी नामफलक लावण्याची मागणी केली. यासंदर्भातील निवेदन मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, भाजप गटनेते अभिजित करंजुले पाटील तसेच शिवसेना गटनेते रवींद्र करंजुळे यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...

उच्च न्यायालयाचा बँक ऑफ बडोदाला दणका! सायबर फसवणुकीतील पैसे वृद्धेला परत करण्याचे आदेश

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते दीपिकाचे वडील; तिचं लग्न झाल्यावर बाथरूममध्ये बसून रडलेले, कोण आहे ती अभिनेत्री?

Alephata Crime : भोंदूगिरीच्या नावाखाली अत्याचार; आळेफाट्यात दोन 'बाबांना' बेड्या

Pune Bribe Case : भूजल सर्वेक्षण विभागातील दोन भूवैज्ञानिक लाच घेताना ताब्यात

SCROLL FOR NEXT