मुंबई

भाईंदरच्या सरकारी रुग्णालयात दीड कोटींची मुदतबाह्य औषधे

CD

दीड कोटींची मुदतबाह्य औषधे
भाईंदरच्या सरकारी रुग्णालयातील प्रकार उघडकीस

भाईंदर, ता. २४ : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी (टेंबा) सरकारी रुग्णालयात दीड कोटींहून अधिक किमतीच्या मुदत संपलेल्या औषधांचा साठा असल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी (ता.२४) परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयाची पाहणी केली त्या वेळी त्यांना हा साठा दिसून आला.
सक्षम फाउंडेशन या संस्थेने २७ मार्चला आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील त्यांच्या उपस्थितीत तब्बल एक कोटी ६५ लाख रुपयांची औषधे रुग्णालयाला मोफत दिली होती. वास्तविक या औषधांची रुग्णालयाकडून कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती. तसेच यातील बहुतेक औषधे रुग्णालयाकडून वापरलीदेखील जात नव्हती. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णालयातील डॉक्टरांनी या औषधांची मुदत तपासली असता ती ३० मार्च पर्यंतच असल्याचे त्यांना दिसून आले. मुदत संपायला अवघ्या ४८ तासांचा कालावधी शिल्लक असताना ही औषधे रुग्णालयाला देण्यात आली होती. सामान्यतः कोणत्याही रुग्णालयात किमान सहा महिने वैधता असलेली औषधेच स्वीकारली जातात. अशा परिस्थितीत रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला. ही औषधे परत घेऊन जाण्याबाबत रुग्णालयाने संस्थेला पत्रही दिले. मात्र, त्यानंतरही संस्थेने औषधे परत नेली नसल्याने ती रुग्णालयातच पडून राहिली आहेत. प्रताप सरनाईक यांनी या वेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनाही दूरध्वनीद्वारे याची माहिती दिली.

रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. केवळ दिखावा आणि प्रसिद्धीसाठी मुदत संपण्याच्या उंबरठ्यावर असलेली औषधे रुग्णालयाला देणे हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई होणारच. सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून असे प्रकार घडवून आणणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. रुग्णांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT