बालकांसाठी ‘मानस प्रकल्प’
१० जिल्ह्यांत अभियान; समग्र दृष्टिकोन होणार विकसित
मुंबई, ता. २४ : बालकांच्या मानसिक आरोग्याच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि मनमुक्त फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने `मानस प्रकल्प-सुरक्षित बालपण, समृद्ध महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत १० जिल्ह्यांमध्ये पायलट प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांमध्ये वाढता तणाव, नैराश्य, भावनिक असंतुलन आणि तीव्र स्पर्धात्मक वातावरणामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्यांचा विचार करता, या क्षेत्रात ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मानस’ (मानसिक आरोग्य जागरूकता, संगोपन आणि सामाजिक-भावनिक बळकटीकरण) प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समग्र दृष्टिकोन स्वीकारण्यात येणार असून, विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक यांचाही सक्रिय सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे.
--
पहिली ते बारावीपर्यंत स्वतंत्र अभ्यासक्रम
इयत्ता १ली ते ४थी, ५वी ते ८वी आणि ९वी ते १२वी अशा वयोगटानुसार स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि समुपदेशक यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेले मॉड्युल्स हे क्रियाधारित आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतीवर आधारित असतील.
--
तणावमुक्त वातावरण
यात पालकांसाठी जाणिवांचे पालकत्व आणि प्रभावी संवाद कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षकांसाठी भावनिक सहाय्य व वर्ग व्यवस्थापनासंबंधी विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाईल. हा प्रकल्प वर्षभर चालणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भावनिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल. तसेच शाळांमध्ये तणावमुक्त आणि सहकार्यशील वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.