भिवंडी, ता. २४ (वार्ताहर) : राज्यात रिक्षा व टॅक्सीचालकांवर मराठी भाषेची सक्ती करण्यापूर्वी त्यांना मराठी शिकविण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे मत भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केले. गुरुवारी महापालिकेत भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
परिवहन विभागाने १ मेपासून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला असून यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत बोलताना शेख म्हणाले, आपली भाषा आणि संस्कृती जपणे गरजेचे असले तरी सक्ती करण्यापूर्वी चालकांना मराठी शिकण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रिक्षाचालकांसाठी मराठी प्रशिक्षण; तसेच सांस्कृतिक मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याची मागणी त्यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. ही सक्ती तातडीने लागू न करता किमान सहा महिन्यांचा अवधी देऊन नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी. त्यानंतर मराठीचे ज्ञान अनिवार्य करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.