मुंबई

महानिर्मितीच्या संचालक पदी अभय हरणे

CD

महानिर्मितीच्या संचालकपदी अभय हरणे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : महानिर्मितीच्या संचालक (संचलन) या पदावर अभय हरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पदभार स्विकारला. या वेळी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. उपस्थित होते. ते याआधी महानिर्मितीमध्ये संचालक (प्रकल्प) या पदावर कार्यरत होते.
महानिर्मितीमध्ये संचालक (प्रकल्प) म्हणून कार्यरत असताना कंपनीचा स्थापित क्षमता विस्तार व नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांना गती देण्यात अभय हरणे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ अनुरूप महानिर्मितीच्या ‘व्हिजन २०३५’ आराखड्याच्या निर्मितीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सौर, उदंचन जलविद्युत प्रकल्प, एस.एम.आर. अणु प्रकल्प तसेच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेला विविध व शाश्वत ऊर्जानिर्मिती प्रकल्प विकसित करण्यासोबत महानिर्मितीच्या मालकीची छत्तीसगड येथील गरे पालमा २ कोळसा खाण कार्यान्वित करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. हरणे यांनी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी तसेच एमबीए पदवी प्राप्त केली आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून त्यांना २०१३ मध्ये गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT