मुंबई

शिक्षकांच्या दैनंदिन तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे

CD

जीवनशैलीत मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे!
डॉ. यश वेलणकर यांचे शिक्षकांना मार्गदर्शन

मुंबई, ता. २५ ः शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा विषय केंद्रस्थानी ठेवत आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. शिक्षकांच्या दैनंदिन जीवनशैलीत मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित करीत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश वेलणकर यांनी मार्गदर्शन केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच आणि पुणे विद्यार्थिगृह यांच्या वतीने घाटकोपर येथील पुणे विद्यार्थिगृहाच्या विद्याभवन संकुलात ‘शिक्षकांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर ही कार्यशाळा झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी शिक्षकांवरील वाढत्या मानसिक तणावाचे वास्तव अधोरेखित केले. बीएलओ, जनगणनेसारख्या अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि विविध प्रशासकीय कामांमुळे शिक्षकांच्या मानसिक संतुलनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षक मानसिकदृष्ट्या सक्षम असतील, तरच पुढील पिढी सक्षम घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. यश वेलणकर यांनी मेंदूतील रासायनिक बदलांमुळे चिंता, दडपण आणि भावनिक असंतुलन कसे निर्माण होते, हे सोप्या भाषेत स्पष्ट केले. परिस्थिती आपल्या मानसिक क्षमतेपेक्षा अधिक झाली की तणाव निर्माण होतो, असे सांगत त्यांनी तणाव, संघर्ष, दडपण आणि नैराश्याबाबत विश्लेषण केले. ‘भावनांची मोजपट्टी’ या संकल्पनेद्वारे स्वतःच्या भावनांचे आकलन करण्याचे तंत्र त्यांनी शिकवले.
---
सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व!
तणाव व्यवस्थापनासाठी ‘माइंडफुलनेस’, डीप ब्रीदिंग, शरीर सैल करण्याचे व्यायाम आणि ‘कॉग्निटिव्ह थेरपी’ यांसारख्या उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. तसेच सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले. डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करणे, छाती व पोटाच्या हालचाली जाणून घेणे, अशा कृतीद्वारे साक्षीभाव, करुणाभाव आणि कल्पनाभाव यांची ओळख करून देण्यात आली. तणावाकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT