मुंबई

कर्जत तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल

CD

महसूल सहाय्यकावर
लाच मागणीचा गुन्हा

कर्जत, ता. २५ (बातमीदार) : कर्जत तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश विश्वनाथ नाथजोगी (४७), महसूल सहाय्यक (वर्ग-३), तहसील कार्यालय कर्जत यांनी तक्रारदाराच्या जात पडताळणी अहवालासंदर्भातील काम करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १४ जानेवारीला प्राप्त झाली होती. त्यानंतर १५ जानेवारीला ॲन्टी-करप्शन ब्युरोच्या पथकाने तहसील कार्यालयात पडताळणी कारवाई केली. या पडताळणीत आरोपी नाथजोगी यांनी पंचासमक्ष एक ते दोन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ॲन्टी-करप्शन ब्युरो, रायगड-अलिबाग पथकाने केली असून, पोलिस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण सरोदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT