राज्यात २ मेपासून
दिव्यांगांचे सर्वेक्षण
मुंबई, ता. २५ : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ० ते १८ वयोगटातील दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण २ मे ते १० जुलै २०२६ या कालावधीत केले जाणार आहे. या सर्वेक्षणात मुलाचे वय, वर्ग, पत्ता, फोन नंबर, दिव्यांग मुलांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांत त्यांना पुरविण्यात येणारे मदतनीस, परिवहन, लेखनिक, प्रोत्साहन भत्ता, साहित्य साधने इत्यादी माहिती भरली जाणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी ही शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ‘चिल्ड्रन विथ स्पेशल नीड’ बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. जनगणनेच्या कामासोबत दिव्यांग बालकांचे सर्वेक्षण करताना शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.
महाराष्ट्र प्राथमिक परिषदेच्या माहितीनुसार, ० ते १८ वयोगटातील दिव्यांग बालकांचे सर्वेक्षण हे शिक्षकांच्या माध्यमातून अंगणवाडी, शाळा तसेच परिसरात प्रत्यक्ष जाऊन करण्यात येणार आहे. दररोज एक गाव किंवा मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार वेळापत्रक ठरवले जाणार आहे.
जिल्हास्तरावर किमान २५ टक्के शाळांना भेट देऊन सर्वेक्षणाची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकही दिव्यांग बालक वंचित राहू नये, यासाठी १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यावर भर आहे. जनगणनेचे आदेश एका गावासाठी असून दिव्यांग बालकांच्या सर्वेक्षणाची गावे वेगळी असल्याने दोन्ही कामे एकाचवेळी पार पाडताना शिक्षकांसमोर मोठे संकट निर्माण झाल्याचे समग्र शिक्षणातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
-----
१५ जुलैपर्यंत अंतिम अहवाल
एकही दिव्यांग बालक वंचित राहता कामा नये. दिव्यांग बालकांच्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल १५ जुलै २०२६ पर्यंत सॉफ्ट कॉपीद्वारे संबंधित कार्यालयात सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक संजय यादव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.