सरसंघचालकांसह गडकरी,
फडणवीसांनी माफी मागावी!
अपमानप्रकरणी काँग्रेसची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल आध्यात्मिक गुरू धीरेंद्र शास्त्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा शास्त्री बरळला, तरीही त्यावर या तीन नेत्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजप, आरएसएसचे धोरण असून महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकली होती, तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याची टीकाही सपकाळ यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.