मुंबई

ठाण्यात पुष्पा स्टाईलने विदेशी मद्याची तस्करी; १.४५ कोटींचा मुद्देमाल जप्त

CD

ठाण्यात विदेशी मद्याची तस्करी
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १.४५ कोटींचा मुद्देमाल जप्त

ठाणे, ता. २५ ः सिमेंटच्या गोण्यांखाली गुप्त कप्पे तयार करून परराज्यातील विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल एक कोटी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील बेलापूर-ठाणे रोडवरील डी. वाय. पाटील स्टेडियमजवळ शुक्रवारी (ता. २४) गस्त घालत असताना ठाणे-१ भरारी पथक क्रमांक एकने संशयित ट्रक थांबवून तपासणी केली. ट्रकमध्ये वंडर सिमेंटच्या गोण्या आढळल्या. त्या बाजूला केल्यानंतर खाली बनवलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये पुठ्ठ्याचे बॉक्स सापडले. बॉक्स उघडून पाहिल्यावर त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित व मध्य प्रदेशात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत एकूण एक हजार २६५ बॉक्स म्हणजेच १० हजार ९२९ लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दारूबंदी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विदेशी मद्य आणि ट्रकसह एकूण एक कोटी ४५ लाख २३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालक दिनेश कैलास नाथ आणि अनिल कुमार श्यामलाल नायक यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT