‘सहकारी महाराष्ट्र’चे उद्या प्रकाशन
मुंबई, ता. २५ : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा १०७ आणि सहकारी महाराष्ट्राचा ६७ वर्षांचा वारसा असलेले सहकार चळवळीचे मुखपत्र ‘सहकारी महाराष्ट्र’चे सोमवारी (ता. २७) राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर असतील. मुंबई जिल्हा बँकेच्या फोर्ट मुख्यालयातील पद्मश्री वसंतदादा पाटील सभागृहात दुपारी एक वाजता होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय सहकारी संघाचे अध्यक्ष (दिल्ली) संजीव कुसाळकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे तज्ज्ञ संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील राऊत, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक नंदकुमार काटकर, सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ही माहिती आयोजक राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, मानस सचिव रामदास मोरे, संचालक प्रकाश दरेकर, अनिल गजरे, नितीन बनकर, विष्णू घुमरे, जयश्री पांचाळ यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.