अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे यकृत प्रत्यारोपणाला गती
केईएम रुग्णालयात एकाच दात्यापासून दोन रुग्णांना जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून, अत्याधुनिक कॅव्हिट्रॉन अल्ट्रासोनिक सर्जिकल ॲस्पिरेटर (सीयूएसए) मशीनमुळे उपचारांना वेग मिळाला आहे. सर्जिकल गॅस्ट्रोएन्टरोलॉजी विभागात या यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात आली असून, मागील १५ दिवसांत दोन यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एका दात्याचे यकृत दोन रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही सीयूएसए मशीन सीएसआर अंतर्गत मझगाव डॉक शिपबिल्डर्सकडून प्राप्त झाली आहे. या अत्याधुनिक यंत्रामुळे जटिल यकृत शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि सुरक्षित पद्धतीने करता येणार आहेत.
विशेषतः जिवंत दात्याकडून यकृत प्रत्यारोपणमध्ये हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार असून, दात्याची सुरक्षितता राखत निरोगी ऊतींचे संरक्षण करण्यात मदत होते. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी होऊन परिणाम अधिक चांगले मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.