मुंबई

विधिचषक क्रिकेट स्पर्धेची दिमाखदार सांगता

CD

विधीचषक क्रिकेट स्पर्धेची दिमाखदार सांगता
रिझवी महाविद्यालय संघ विजेता; चुरशीच्या अंतिम सामन्यात केईएसवर मात
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे न्यू लॉ कॉलेज मुंबई आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या विधीचषक लॉ कॉलेजेस पुरुष क्रिकेट स्पर्धा २०२६चा सांगता समारंभ सोमवारी (ता. २७) दुपारी १२.३० वाजता एमसीए रिक्रिएशन सेंटर, जी-ब्लॉक, बीकेसी, वांद्रे येथे उत्साहात पार पडला.
कायद्याच्या विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती, संघभावना आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. मुंबई व उपनगरांतील आघाडीच्या विधी महाविद्यालयांना एकत्र आणणारा हा उपक्रम विधी शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा आंतरमहाविद्यालयीन क्रीडा मंच ठरला.
उद्‌घाटनाप्रसंगी पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश र. म. जोशी, विशेष अतिथी म्हणून माजी भारतीय महिला क्रिकेटपटू डायना एडलजी उपस्थित होत्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी मुंबई क्रिकेट क्लबचे संस्थापक ज्वाला सिंग यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास डॉ. शिवानी एस. शेलार (प्रभारी प्राचार्य, न्यू लॉ कॉलेज, मुंबई) आणि अजिंक्य नाईक (अध्यक्ष, एमसीए) यांचीही प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेतील अंतिम सामना रिझवी महाविद्यालय आणि केईएस विधी महाविद्यालय यांच्यात रंगला. अत्यंत चुरशीच्या लढतीत रिझवी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत एकूण १४ नामांकित विधी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

अमेरिकन लोक चीनमधून मागवत घर बांधण्याचं सामान! बाजारात ‘चायना होम्स’ची एंट्री; हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय?

'मटका किंग'मध्ये एवढी मोठी चूक? नागराज मंजुळे विसरले पण प्रेक्षकांच्या नजरेतून नाही सुटली ती गोष्ट, म्हणतात- अरे...

Pune Domestic Violence Case: महिला पोलीस अंमलदाराचाच सासरकडून छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik News : एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांकडून मृत्युपत्राची नोंद; ॲड. एकबोटे यांना ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे प्रमाणपत्र

SCROLL FOR NEXT