‘भारतातील संशोधन परिसंस्था’ विषयावरील परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पालघर, ता. २७ (बातमीदार) : चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या पी. एल. श्रॉफ महाविद्यालयाच्या वतीने ‘भारतातील संशोधन परिसंस्था’ या समकालीन व महत्त्वपूर्ण विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या वेबिनारला देशभरातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सीटीईएसचे अध्यक्ष दर्शनभाई श्रॉफ तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समितीचे अध्यक्ष रजनीकांतभाई श्रॉफ उपस्थित होते. त्यांनी भारतातील संशोधन परिसंस्था नवोपक्रम, तंत्रज्ञान, सहकार्य व नैतिक जबाबदारी यांच्या आधारे झपाट्याने विकसित होत असल्याचे सांगितले. शैक्षणिक संस्थांनी जिज्ञासा, चिकित्सक विचारसरणी व सातत्यपूर्ण शिक्षणाला चालना देणारे वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्मिता शुक्ला व डॉ. सारिका सागर यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. स्मिता शुक्ला यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संधी, सहकार्याची साधने आणि उच्च प्रभावी संशोधन प्रकाशनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. सारिका सागर यांनी एआय आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संशोधन प्रक्रिया अधिक परिणामकारक, सुलभ व गतिमान कशी करता येते, याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. सुचिता करवीर यांचे मार्गदर्शन लाभले. आयक्यूएसी समन्वयक डॉ. चित्रा आष्टेकर, संयोजक डॉ. वनश्री फाळके, सह-संयोजक प्रा. रंजिता कपूर, प्रा. निष्ठा केळकर, प्रा. अँजेलिना क्रूझ यांनी कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीपणे पार पाडले. प्रा. गौरी दातीर यांनी संसाधन व्यक्ती सुचवून कार्यक्रमाची गुणवत्ता उंचावली. सूत्रसंचालन प्रा. परवीन सोलंकी यांनी केले. या वेळी बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथील मराठी विभागप्रमुख डॉ. नामदेव गपाटे, शिवाजी विद्यापीठातील डॉ. सीमा मुसळे, रवींद्र जाधव तसेच विविध विद्यापीठांतील संशोधक व विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. एम.के. ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. वनश्री फाळके यांनी उपस्थित मान्यवर, सहभागी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. सहभागींच्या सक्रिय प्रतिसादामुळे हा वेबिनार ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.