एलन मुंबईचा जेईई-मेन २०२६मध्ये दमदार ठसा
अव्वल रँक, उच्च पर्सेंटाईल आणि फिजिक्समध्ये १०० स्कोअरची कामगिरी
मुंबई, ता. २७ : जेईई-मेन २०२६च्या निकालात एलन मुंबईच्या विद्यार्थ्यांनी अव्वल रँक आणि उच्च पर्सेंटाईल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलेल्या जेईई-मेन २०२६च्या निकालात ‘एलन मुंबई’च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत घवघवीत यश मिळवले आहे. उच्च रँक आणि उत्कृष्ट पर्सेंटाईल स्कोअरद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेची ठसठशीत छाप उमटवली. एलन मुंबईचा हेत दिओरा याने ऑल इंडिया रँक २०९ मिळवला आहे. त्याचबरोबर अभय गुप्ता (एआर २१४), चैतन्य सोनी (एआर २७९), तेजस आनंद (एआर ४६४) आणि मंथन ठक्कर (एआर ४८७) यांनीही अव्वल स्थान पटकावत संस्थेच्या यशात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे संस्थेच्या तीन विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र विषयात १०० पर्सेंटाईल मिळवून शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.
एलनचे महाराष्ट्र डेप्युटी झोनल हेड नेहचल सिंह हंसपाल यांनी सांगितले, की क्लासरूममधील विद्यार्थ्यांनी यंदाही सातत्याने उत्कृष्ट निकाल दिले आहेत. विद्यार्थ्यांची मेहनत, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेची मजबूत शैक्षणिक पद्धती यामुळे हे यश शक्य झाले. एलन करिअर इन्स्टिट्यूटचे सीईओ नितीन कुकरेजा यांनी माहिती दिली, की राष्ट्रीय स्तरावर एलनचा विद्यार्थी कबीर छिल्लर याने ऑल इंडिया रँक एक मिळवला आहे. देशातील पहिल्या १०मध्ये एलनचे चार विद्यार्थी असून, अर्णव गौतम (एआर ५), शुभम कुमार (एआर ६) आणि ऋषी प्रेमनाथ (एआर ८) यांचा समावेश आहे. तसेच पहिल्या २० मध्ये नऊ आणि पहिल्या १०० मध्ये ४१ विद्यार्थी एलन क्लासरूमचे आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सर्वोत्तम तयारी देण्याचा आमचा संकल्प कायम राहील, असेही कुकरेजा यांनी स्पष्ट केले.
----
निकालातील ठळक बाबी
पाच विद्यार्थी टॉप ५०० मध्ये
१० विद्यार्थी टॉप १,००० मध्ये
२४ विद्यार्थी टॉप २,००० मध्ये
२९ विद्यार्थी टॉप ३,००० मध्ये
४१ विद्यार्थी टॉप ५,००० मध्ये
१०४ विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाईलपेक्षा जास्त गुण
----
photo :
MUM26-F36314
MUM26-F36315
MUM26-F36316
MUM26-F36317
MUM26-F36318
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.