रस्ते अपघाताविरोधात मोहीम
बोईसरमध्ये ‘एक अंमलदार-एक जनजागृती’ उपक्रम
बोईसर, ता. २८ (वार्ताहर) ः पालघर जिल्हा पोलिसांकडून ‘एक अंमलदार-एक जनजागृती’ उपक्रमातून रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती सुरू आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत वाहतुकीच्या ४१ महत्त्वाच्या ठिकाणी अधिकारी, अंमलदारांनी नागरिकांशी संवाद साधला.
या उपक्रमात रिक्षाचालक-मालक संघटना, ट्रकचालक-मालक, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, महाविद्यालयीन विद्यार्थी, डिलिव्हरी बॉईज तसेच इतर नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहनचालकांना अपघात प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वाहतूक व्यवस्थापनातील अडचणी, समस्या, त्यावरील उपाययोजना याबाबत उपस्थितांशी चर्चा करण्यात आली. या उपक्रमाला जिल्हाभरातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.