मुंबई

ग्रामीण भागात घरे शाकारणीची लगबग

CD

घरे शाकारणीची लगबग
ग्रामीण भागात मॉन्सूनपूर्व तयारीला वेग
मोखाडा, ता. २८ (बातमीदार)ः मॉन्सूनच्या आगमनाला दीड महिना शिल्लक आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाची चाहूल लागल्याने घरे शाकारणीची लगबग सुरू आहे.
काही दिवसांपासून सकाळच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी दिसू लागली आहे. आठवडाभरापूर्वी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाळ्यात घरात गळती होऊ नये, यासाठी नागरिकांनी डागडुजीची कामे हाती घेतली आहेत. जुनी कौले काढून नवीन कौले बसवणे, खराब झालेल्या लाकडी रिपा बदलणे तसेच सिमेंट, लोखंडी पत्र्यांची अदलाबदलीची कामे सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ग्रामीण भागातील बहुतांश घरे कौलारू असल्याने पावसाळ्यात विशेष खबरदारी घेतली जाते. घरांवर सिमेंटचे पत्रे असली तरी पाणी झिरपत असल्याने अन्नधान्य, जनावरांचा चारा तसेच इतर साहित्य खराब होऊ नये, यासाठी आच्छादनाची व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात लागणारी वैरण, लाकूडफाटा साठवण्याची तयारी सुरू आहे.
-------------------------
एकोप्याचे दर्शन
रोहिणी नक्षत्र २५ मेपासून सुरू होणार असले तरी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर वादळी पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांनी छप्पर दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. पण कामांसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारला असून एकमेकांच्या कामांना हातभार लावत सामूहिक पद्धतीने दुरुस्तीची कामे पूर्ण केली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray MP: ठाकरेंच्या ६ खासदारांभोवती राजकीय सस्पेन्स कायम! अपात्रतेचा धोका की नवा राजकीय डाव? कायदा नेमकं काय सांगतो?

Global Inflation: युद्ध संपले तरी महागाईची धग कायमच! इंधन, प्रवास, मालवाहतूक दर लगेच कमी होणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Monsoon Forecast Maharashtra : मान्सून रेंगाळला ! राज्यातील 'या' भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुण्यातही तापमानात होणार वाढ

Fifa World Cup 2026 : लिओनेल मेस्सीची हॅटट्रिक, वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी अन् अश्रू अनावर; अर्जेंटिनाचा अल्जेरियावर दणदणीत विजय

Latest Marathi News Live Update : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज येणार रत्नागिरीत; ठाकरे गटातील नेत्यांचा पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT