मुंबई

ॲग्नेल स्कूल ऑफ लॉचा पदवीदान समारंभ

CD

ॲग्नेल स्कूल ऑफ लॉचा पदवीदान समारंभ
१३५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ ः नवी मुंबईतील वाशी सेक्टर नऊ येथील अग्नेल स्कूल ऑफ लॉचा पदवी समारंभ शनिवारी (ता. २५) उत्साहात पार पडला. या समारंभात एकूण १३५ विधी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली असून मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या समारंभात तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमातील ४६ विद्यार्थी तसेच पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमातील ८९ विद्यार्थी सहभागी झाले होते. अग्नेल चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक फादर अल्मेडा आणि फादर पिटर डिसुझा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वकिली व्यवसायातील प्रामाणिकपणा आणि संयमाचे महत्त्व अधोरेखित केले.
विधी शाखेचे संचालक डॉ. अंबरीश पटनिगेरे (माजी अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका) यांनी आपल्या भाषणात संस्थेचा इतिहास आणि विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच मुंबई विद्यापीठात अग्नेल स्कूल ऑफ लॉने सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला.
प्राचार्य डॉ. राजेश साखरे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बॉम्बे हायकोर्टचे न्यायमूर्ती अश्विन दामोदर भोंबे यांनी विद्यार्थ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. तसेच न्यायमूर्ती श्रीराम विनायक शिरसाठ यांनी वकिली क्षेत्राचा इतिहास आणि समाजातील त्याचे स्थान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणामुळे विद्यार्थ्यांना वकिली व्यवसायाची सामाजिक जबाबदारी अधिक स्पष्ट झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT