एमएमआरडीए आदेशाची शेतकऱ्यांकडून होळी
नवनगर प्रकल्पाला कडाडून विरोध
पेण, ता. २८ (वार्ताहर) : एमएमआरडीएकडून प्रस्तावित नवनगर प्रकल्पाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यानुसार मंगळवारी (ता. २८) प्रांताधिकारी कार्यालयासमोर येथील सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलन करीत एमएमआरडीए प्रकल्पाच्या आदेशाची होळी केली.
सामाजिक कार्यकर्ता नंदा म्हात्रे यांनी सांगितले, की एमएमआरडीए प्रकल्प पेण, पनवेल, उरण या भागातील जवळपास १२४ गावांमध्ये होत असून, यात पेणमधील ८८ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाविरोधात जवळपास १९ हजार शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या असतानाही शासन बळजबरीने हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादत आहे. एकीकडे पेण तालुक्यातील एमएमआरडीए प्रकल्पासाठी जवळपास ८८ गावे जात असून, यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी या प्रकल्पाला कायम विरोध करीत असून, शासनाने याकडे लक्ष देऊन एमएमआरडीए प्रकल्प तत्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर, सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे, मोहिनी गोरे, सूर्यकांत पाटील, राजन झेमसे, संतोष ठाकूर, हेमंत पाटील, अभिमन्यू म्हात्रे, सी. आर. म्हात्रे, राजेश म्हात्रे, विकास म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, देवेंद्र कोळी आदींसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.