अंबरनाथ, ता. २८ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता सभागृहात होणार आहे. नगराध्यक्ष तेजस्वी करंजुले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि जनहिताशी संबंधित एकूण ३१ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत.
सभेच्या अजेंड्यावर स्वच्छतेशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रस्ताव ठेवले आहेत. शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दैनंदिन साफसफाईसाठी पाच एचपी प्रेशर पंप आणि जीपीएस यंत्रणा असलेल्या ई-वाहनांद्वारे पुढील तीन वर्षांसाठी कंत्राट देण्याबाबत निर्णय होणार आहे. तसेच, आरोग्य विभागासाठी कीटकनाशक फवारणीसाठी पॉवर स्प्रे इंजिनयुक्त वाहने भाडेतत्त्वावर घेणे आणि नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यावर चर्चा केली जाणार आहे. मोरवली येथील भूखंडावरील आरक्षण बदल, पाले येथील मार्केट आणि शॉपिंग सेंटरच्या भाडेनिश्चितीचा मुद्दा तसेच शहरातील मैदाने आणि नाट्यगृहांच्या भाडेदरात सुधारणा यांसंदर्भातील प्रस्तावही सभेत मांडले जाणार आहेत. याशिवाय, शहरातील हिंदू स्मशानभूमी आणि पर्यावरणपूरक स्मशानभूमीच्या दैनंदिन देखभाल-दुरुस्तीची कामे सामाजिक संस्था किंवा स्वयंसेवी संस्थांकडे सोपविण्याबाबतही विचारविनिमय होणार आहे.
सामाजिक विषयांनाही प्राधान्य
सफाई कामगारांची स्वेच्छानिवृत्ती, दिव्यांगांना सायकलींचे वाटप, नगर परिषद कार्यालयातील सीसीटीव्ही, आयटी यंत्रणा आणि सॉफ्टवेअरचे नूतनीकरण यांसारख्या तांत्रिक विषयांचाही अजेंड्यात समावेश आहे. तसेच, आठवडे बाजारांचे नियोजन आणि शहरातील बेघर नागरिकांसाठी भोजन व निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासंदर्भातील सामाजिक विषयांनाही सभेत प्राधान्य दिले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.