Sanjay Dina Patil in Contact With Eknath Shinde
esakal
शिवसेनेच्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. यात ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याही समावेश आहे. त्यांच्याबाबत आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठा दावा केला आहे. संजय दिना पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आपण यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी दिली होती, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.