मुंबई

रोह्यात मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग

CD

रोह्यात माॅन्सूनपूर्व नालेसफाईला वेग
नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्याकडून पाहणी
​रोहा, ता. ४ (बातमीदार) : शहरात तसेच अष्टमी गावात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मॉन्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ झाला. कडक उन्हातही नगराध्यक्षा व नगरसेवकांनी विविध भागांची पाहणी करत कामाचा आढावा घेतला.
शहरातील मुख्य नाले व उपनाल्यांची साफसफाई करून सांडपाणी व डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी दिली. दमखाडी येथील सातमुशी नाला, सागर डेरी परिसर, कोर्ट रोड, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसर, मेहेंदळे हायस्कूल मार्ग, संजय गांधी हॉस्पिटल, रोहा पोस्ट ऑफिस, उरूस मैदान, मुख्य बाजारपेठ, वीर सावरकर रोड, दामजी मेघजी गिरण रोड, आडवी बाजारपेठ, फिरोज टॉकीज परिसर, अष्टमी नाका आदी ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता करण्यात येत आहे.
या मोहिमेत नाल्यातील कचरा, साचलेली माती, रेती तसेच प्लॅस्टिक काढून नाले पूर्णपणे प्रवाही केले जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून शहर जलमय होण्यापासून वाचवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी मुख्याधिकारी अजयकुमार एडके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, गटनेते महेंद्र गुजर, सभापती महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, राजेंद्र जैन, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगरसेवक अजीत मोरे, प्रशांत कडू, प्रेषित बारटक्के, स्वप्नील धनावडे, राकेश पवार, लीलाधर मोरे, घनशाम कराळे आदी उपस्थित होते.

चौकट
पूर प्रतिबंधासाठी नियोजनबद्ध उपाययोजना
शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी केवळ नालेसफाई पुरेशी नसून, नाल्यांची वहनक्षमता वाढवणे, अडथळे दूर करणे आणि नियमित देखभाल ठेवणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने या मोहिमेत मोठ्या नाल्यांसह छोट्या जोडनाल्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जलद गतीने वाहून जाण्यास मदत होणार असून, नागरिक व व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT