कर्मवीर विद्यालयाचे एनएमएमएस परीक्षेत सुयश
विरार (बातमीदार) : रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. ज्युनियर कॉलेज, जूचंद्र, वसई येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना एनएमएमएस स्पर्धा परीक्षेत भरघोस यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत एकूण सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. त्यामध्ये कनिष्क धनराज भोईर, नयन संदीप बांडागळे, चेतन मल्हारी शिकारे, सिद्धेश मनोज जाधव, प्रचिती महेश गावड व प्रज्वल प्रवीण आठवले यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये यश संपादन करून शासकीय शिष्यवृत्ती मिळविली आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंत त्यांना प्रत्येक वर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल व या परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या एनएमएमएस परीक्षा विभाग प्रमुख वर्षा सोनावळे त्यांचा सत्कार स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील व रयत शिक्षण संस्था, रायगड विभाग, पनवेलचे सहाय्यक विभागीय अधिकारी तथा मुख्याध्यापक विलासराव जगताप यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.