मुंबई

खासगी बसकडून दुप्पट तिकीट दरवाढ

CD

खारघर, ता. ६ (बातमीदार) : मुंबईहून विदर्भातील पुसद, दिग्रस या भागांकडे जाणाऱ्या खासगी बस कंपन्यांनी तिकीट दरात अचानक दुप्पट वाढ केल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याच संधीचा फायदा घेत ट्रॅव्हल्स चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

विदर्भातील यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, दारव्हा, मनोरा, मालेगाव आदी तालुक्यातील बहुतांश नागरिक हे नवी मुंबई, पनवेल परिसरात नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे सदर भागात पोहोचण्यासाठी अकोला आणि नांदेड मार्गावर रेल्वे आहे. मात्र रेल्वे प्रवासानंतर शंभर ते सव्वाशे किलोमीटर बस अथवा खासगी बसने प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवासी ट्रॅव्हल्सला अधिक पसंदी देतात. त्यात वाशीम, पुसद, दिग्रस, दारव्हा आदी भागातून मोठ्या प्रमाणात बस सुरू केल्यामुळे प्रवासी थेट तालुक्याचा ठिकाणी सेवा उपलब्ध असल्यामुळे खासगी वाहनांनी जातात.

नियमितपणे खासगी बसचे तिकीट ८०० ते १००० रुपयांदरम्यान आहे. आता हा तिकीट दर आता १५०० ते २००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अचानक झालेल्या या वाढीमुळे कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. विशेषतः नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवासी यांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tamil Nadu political drama विजयसमोर पेच! सत्तास्थापनेचा दावा केला पण बहुमतच नाही; राज्यपालांनाही विश्वास नाही, जादुई आकडा कसा गाठणार TVK?

Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

SCROLL FOR NEXT