‘मोडी आपल्या दारी’ उपक्रमात प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन
मुलुंड, ता. ४ (बातमीदार) ः मुलुंडमध्ये ऐतिहासिक वारशाची जपणूक आणि मोडी लिपीच्या प्रसारासाठी ‘मोडी आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मोडी लिपी प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ मंगळवारी (ता. ५) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मुलुंड पश्चिमेतील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहामध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सेवा संघाचे साहित्यसम्राट न. चिं. केळकर ग्रंथालय, मुलुंड आणि आम्ही स्वच्छंदी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. समारंभात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. या वेळी “शिवरायांचे निष्ठावंत सरदार जेधे” या विषयावर दुर्ग अभ्यासक अप्पा परब यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. तसेच शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवज ‘जेधे शकावली’ संदर्भात मोडी तज्ज्ञ पंकज भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.