अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे महापौरांना निवेदन
शहरातील समस्यांबाबत कार्यवाही करण्याची मागणी
तुर्भे, ता. ४ (बातमीदार ): नवी मुंबई शहरातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), नवी मुंबई शाखेच्या वतीने महापौर सुजाता पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शहराच्या विकासामध्ये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये मोलाची भर टाकणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या वेळी अभाविप नवी मुंबई विधी कार्य संयोजिका रागिनी चौहान, वाशी नगर मंत्री प्रेम जाधव, नेरूळ नगर सहमंत्री शिवेंद्र शिरसाट, विश्वजीत पाटील उपस्थित होते. महापौरांनी या मागण्या सकारात्मकतेने विचारात घेऊन त्यावर योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
मागण्या
- ट्युशन क्लासेसच्या इमारतींचे ऑडीट आणि योग्य कार्यवाही
- अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीवर कारवाई
- रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करावी
- हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना
- फ्लेमिंगो पक्ष्यांचे संवर्धन करावे.
- शैक्षणिक संस्थांच्या परिसरात असलेल्या मद्य आणि सिगारेट विक्री केंद्र बंद
- विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासकीय वसतिगृह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.