मुंबई

तळवली नाक्यातील वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त

CD

तळवली नाक्यातील वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त

वाशी, ता. ४ (बातमीदार) : तळवली नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः ठाणे-बेलापूर मार्गावर वाशीकडून ऐरोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रबाळे परिसरात सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र आहे.

मुख्य मार्गावरील या कोंडीमुळे वाहनचालक पर्यायी मार्ग म्हणून तळवली नाका येथील अंतर्गत रस्त्यांचा वापर करत आहेत. मात्र, या रस्त्यांवरही बेकायदेशीर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय मांडल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही उभ्या केलेल्या गाड्या आणि अनियंत्रित पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी वाढून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, बेकायदा फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
--------------
ठोस उपाययोजनांची मागणी
तसेच, अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नागरिकांकडूनही या परिसरातील वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

HSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

SCROLL FOR NEXT