विमानतळ-खांदेश्वर सबवेला पर्यावरणाचा अडथळा!
मंजुरीनंतरच कामाला गती; सचिन गायकवाड यांचा पाठपुरावा
पनवेल, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या खांदेश्वर रेल्वे स्थानक मार्गाच्या कामाला सध्या पर्यावरणीय परवानग्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. सिडकोने याबाबत स्पष्ट करताना सांगितले की, आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. कामोठे येथील स्थानिक रहिवासी सचिन गायकवाड यासाठी पाठपुरावा करीत आहेत. परवानगी करिता सिडकोकडूनसुद्धा हालचाली सुरू झाल्या आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून खांदेश्वर रेल्वे स्थानकपर्यंत प्रस्तावित भुयारी मार्ग तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा ही महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी तसेच वन विभागाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या प्रकल्पासाठी संबंधित विभागांची परवानगी आवश्यक आहे. या मार्गासाठी कोस्टल झोन मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतले जाणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. त्यामुळे सध्या प्रकल्प रखडलेला असला तरी मंजुरीनंतर कामाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
------------------
काम लवकर करण्याची मागणी
हा मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि खांदेश्वर रेल्वे स्थानक यांच्यातील संपर्क सुलभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, नागरिक आणि प्रवासीवर्गाकडून या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत असून, सिडकोकडूनही मंजुरी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे सचिन गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.