मुंबई

वसई विरारच्या महापौरांनी केली स्वगणना

CD

प्रथम नागरिकाला स्वगणनेचा मान
जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे आवाहन

विरार, ता. ६ (बातमीदार) ः वसई-विरार पालिका क्षेत्रातील जनगणना उपक्रमाला गती देण्यासाठी महापौर अजीव पाटील यांच्या शहरातील अनेक मान्यवरांनी स्वगणना केली. या वेळी शहरातील सर्व नागरिकांनीही स्वगणना करून राष्ट्रकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे आवश्यक आहे. स्वगणना ही सोपी, सुरक्षित तसेच वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर अजीव पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील तसेच विविध संस्थांशी संबंधित मान्यवरांनीही स्वगणना करून इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
------------------------
जनजागृती सुरू
नागरिकांनी अचूक तपशील द्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. जनगणनेतून मिळणारी माहिती भविष्यातील विकास योजना, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सेवांच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरणार असल्याने स्वगणना प्रक्रियेबाबत विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टर मुलगा ठरला राजकीय सर्जन! वडिलांचा अनुभव, मुलाची रणनीती...; शिंदे पिता-पुत्रांच्या जोडीने ठाकरेंना दिला अनपेक्षित झटका

ZP School : ‘सकाळ’ला ऑनलाईन बातमी येताच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्वच शाळा सकाळच्या सत्रात भरणार; शिक्षण विभागाकडून निघाले आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

खुशखबर! विदर्भात अखेर मॉन्सून दाखल; दहा वर्षांत दुसऱ्यांदा उशिरा आगमन, येलो अलर्ट जारी

Manmad Crime : मनमाडमध्ये पहाटे दुहेरी हत्याकांड; महामार्गालगत झोपलेल्या दोघांना दगडाने ठेचले

SCROLL FOR NEXT