डॉक्टर मुलगा ठरला राजकीय सर्जन! वडिलांचा अनुभव, मुलाची रणनीती...; शिंदे पिता-पुत्रांच्या जोडीने ठाकरेंना दिला अनपेक्षित झटका

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर'च्या यशानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना 'गद्दार' म्हटले आहे. सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
Shrikant Shinde  executed Operation Tiger

Shrikant Shinde executed Operation Tiger

ESakal

Updated on

मुंबई : बंगाल निवडणुकीतील टीएमसीचा (TMC) पराभव आणि त्यानंतर त्यांच्या आमदार व खासदारांनी केलेले बंड यांनंतर, महाराष्ट्रात घडलेल्या 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा देशभर होत आहे. 'ऑपरेशन लोटस'च्या धर्तीवर राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन टायगर'कडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गांभीर्याने पाहिले नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केले, आणि याचा पक्षाला मोठा फटका बसला आहे. आता हा पक्ष आययूएमएल (IUML) आणि जेएमएम (JMM) यांच्या बरोबरीला आला आहे. हे दोन्ही पक्ष 'इंडिया' (INDIA) आघाडीचे प्रमुख घटक असून त्यांचे प्रत्येकी नऊ खासदार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com