मुंबई

मिठी नदी सफाईचा बोजवारा

CD

मिठी नदी सफाईचा बोजवारा
पावसापूर्वी फक्त ३४ टक्के काम पूर्ण; मुंबईत पुराची भीती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईत मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असतानाच, मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मिठी नदीच्या साफसफाईचा बोजवारा उडाला आहे. पालिकेच्या दाव्यांनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निम्मी सफाई होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३४.८१ टक्के गाळ उपसण्यात आला आहे. त्‍यामुळे यंदाही पावसाळ्यात कुर्ला, चुनाभट्टी आणि सायन परिसर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
​यावर्षी पालिकेने गाळ उपसण्याचे मूळ लक्ष्य १२.०३ लाख मेट्रिक टनावरून थेट ८.४७ लाख मेट्रिक टनावर आणले आहे. कामाला सुरुवात करण्यास उशीर झाल्यामुळेच कंत्राटदारांना वाचवण्यासाठी पालिकेने हे लक्ष्य कमी केल्याचा आरोप महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केला;​ मात्र अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनाची बाजू सावरताना सांगितले, की गाळाच्या वजनात ३० टक्के वाटा हा केवळ प्लॅस्टिक आणि तरंगत्या कचऱ्याचा असतो. केवळ गाळाचेच अचूक मोजमाप व्हावे आणि कंत्राटदारांना अवाजवी देयके जाऊ नयेत, यासाठी हा बदल केला आहे.
सफाईच्या संथ गतीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. महापौरांनी पाहणी केली तरी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नक्की किती गाळ काढला जातोय, याचा हिशेबच नाही, असा थेट आरोप ही अशरफ आझमी यांनी केला आहे. केवळ गाळच नाही, तर मिठीच्या संरक्षक भिंतीही जर्जर झाल्या आहेत. त्या कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, असा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी दिला आहे. गोवंडीचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी मिठीसोबतच उपनगरातील छोट्या नाल्यांच्या सफाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
​​थोडक्यात सांगायचे तर पुढच्या दोन आठवड्यांत कामाचा वेग वाढला नाही, तर मुंबईकरांना यंदाही मिठीच्या पुराचा सामना करावा लागण्याची दाट चिन्हे आहेत.

६५ टक्‍के काम बाकी
​पालिकेने यावर्षी एकूण ८.४१ लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यापैकी १.३२ लाख मेट्रिक टन गाळ हा एकट्या मिठी नदीतून काढायचा आहे. पावसाळा जेमतेम २०-२५ दिवसांवर असताना उर्वरित ६५ टक्के काम पूर्ण करणे हे पालिकेसाठी अवघड ठरण्याची शक्यता आहे.

आकडेवारी काय सांगते?
​मिठी नदीच्या सफाईसाठी पालिकेने तीन विभागांत काम विभागले आहे. ६ मे २०२६पर्यंतची अधिकृत आकडेवारी खालीलप्रमाणे आहे :

विभाग / पूर्ण झालेले काम (%)
पूर्व उपनगर / ५२५ /२८.५६
पूर्व उपनगर / ५२६ /४२.४८
पूर्व उपनगर / ५२७/ ३३.०३
एकूण सरासरी ३४.८१ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

७०व्या वर्षी नेत्याचं २० वर्षीय तरुणीशी चौथं लग्न, दुसऱ्या पत्नीची पोलिसात धाव; ११ अपत्यांचा बाप, मुलं न झाल्यानं तिसरीला घटस्फोट

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tata Motors टाटा एस गोल्ड+ XL लाँच; अधिक पेलोड, अधिक कमाई, उद्योजकांसाठी नवे संधीचक्र

SCROLL FOR NEXT